वेश्या व्यवसायातून महिलेसह अल्पवयीन मुलीची सुटका
व्हिजन २४ तास न्यूज
मुंबई :
देह विक्रीच्या दुष्ट चक्रातून महिलेसह एका मुलीची सुटका करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश मिळाले आहे. या प्रकरणात वेश्या व्यवसायासाठी ढकलणाऱ्या आरोपी महिलेला देखील पोलिसांनी अटक केली आहे.राधा पटेल असे अटक महिलेच नाव असून ती गोरेगांवची रहिवासी आहे.
मुंबईतील गोरेगाव भागात एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता अल्पवयीन मुली व स्त्रीयाकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसाना मिळाली होती. त्या प्रमाणे योजना आखून पोलिसांनी पुढील कारवाईचे प्लॅनिंग केले.
५ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एम. एम. आर. डी. ए. कॉलनी, गोरेगाव पश्चिम मुंबई भागात स्थित ठिकाणी पोलीसांना बोगस ग्राहक म्हणून पाठविले. तिथे पोहोचले असता योग्य परिस्थीत हेरून ग्राहकाच्या वेशातील पोलिसांनी छापामार कारवाई केली
या कारवाईत आरोपी महिलेला अटक करून तेथे एक महिला आणि एका मुलीची यशस्वी सुटका पोलिसांनी केली. अधिक चौकशीत आढळून आले की, आरोपी महिला अल्पवयीन मुलींना तसेच महिलाना वेश्याव्यवसायाकरीता बळजबरी करत असे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहे.