एमआयडीसी साठी भूसंपादन करताना बळाचा वापर न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या समन्वयाने भूसंपादन करावे :प्रभाकर देशमुख

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी.
म्हसवड येथील नियोजित एम आय डी सी ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भुसंपादन करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले आहे.
म्हसवड येथे नुकतीच राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख यांची पत्रकार परिषद झाली या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष परेश कुमार होरा म्हसवड येथील राष्ट्रवादीचे नेते जय राजेमाने व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
        म्हसवड आणी परिसरातऔद्योगिक क्षेत्र विकसित होत आहे या भागात एम आय डी सी व्हावी अशी अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती या भागात एम आय डी सी स्थापित होऊन येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी महाविकासआघाडीचे सरकार असताना या परिसरात एकूण जे पडीक क्षेत्र आहे ते विचारात घेऊन इथे एक मोठे क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय एम आय डी सी ने घेतला
 येथे 3200 हेक्टर क्षेत्रा मध्ये एमआयडीसी प्रोजेक्ट होणार असून या प्रोजेक्टसाठी भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले  एम आय डी सी ही झालीच पाहिजे या परिसरातील लोकांशी बोलल्या नंतर ही एमआयडीसी व्हावीअशी त्यांचीही भावना आहे   हे करत असताना स्थानिक लोकज्यांच्या जमिनी  जात आहेत जे भुमीपुत्र आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने  एमआयडीसी व्हावी अशी सर्व लोकांची भावना आहे आमची पण तशीच मागणी आहे .
                  पण नियोजित एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या नोटीस न देता अधिकाऱ्यांनी पोलिसाच्या बळाचा वापर करून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन मोजणी सुरू केले . याला या परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यापुर्वीही दोन वेळा शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.
 याप्रकरणी काल दिनांक 30 ऑक्टोबर रोजी  बाधित शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या भूसंपादनास विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलन केले . काही शेतकऱ्यांनी विजेच्या डांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी या आंदोलनाकावर गुन्हे दाखल केले .
पोलीस  कर्मचारी व महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली अशी तक्रार भुमि अभिलेख कर्मचारी यांनी दाखल केली आहे.
याबाबत बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, या तक्रारी मध्ये काही तथ्य नसून शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी हे आंदोलन केले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली नाही. तरीही चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
             शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन महसूल व भूसंपादन अधिकाऱ्यांनी याबाबत    विश्वासाहर्ता दाखवणे गरजेचे आहे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने मोबदला देण्यात येणार याबाबत पूर्ण माहिती दिली पाहिजे‌ असे असताना अचानक अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन या परिसरातील मोजणी करण्यासाठी बळाचा वापर केला आहे. वास्तविक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या समन्वयाने भूसंपादन करणे गरजेचे आहे. असे असताना शेतकऱ्यांशी संवाद न सांधता जमीन भूमापनाचे काम सुरू आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून या शेतकऱ्यांच्या वर बळाचा वापर करून गुन्हे दाखल केले आहेत.
शेतकरी हे जमिनीचे मालक आहेत. ते गुन्हेगार नाहीत त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक न देता त्यांच्यामध्ये व एम आय डी सी अधिकारी यांनी समन्वय साधला पाहिजे . असे विचार या वेळेला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले आहेत.
पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी एमआयडीसी अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेऊन समन्वयाने हा प्रश्न सुटला तर भविष्य काळामध्ये एमआयडीसीमध्ये उद्योजक येण्यासाठी तयार होतील अन्यथा एमआयडीसी मध्ये येणारे उद्योजक तयार होणार नाहीत.
 याचा विचार करता.  ही एमआयडीसी शांततामय मार्गाने सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांना किती मोबदला देणार याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी न घेता जिरायत जमीन संपादित करावी व त्यांना योग्य असा मोबदला देण्यासाठी अधिकाऱ्यांनी आश्वस्त करावे .असे मत या वेळेला व्यक्त केले. प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नसून अचानक बळाचा वापर करून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता एमआयडीसी अधिकारी ,महसूल कर्मचारी , पोलीस हे बाळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेण्याचा चुकीचा प्रयत्न करत आहेत,
म्हसवड व परिसरामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. असे असताना पोलिसांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र चुकीची भूमिका घेतली आहे. यात राजकारण करु नये,यामध्ये पोलिसांनी अशा पद्धतीचे चुकीचे वर्तन करू नये व मालक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करू नयेत. त्यांना शासनाची भूमिका व्यवस्थितपणे पटवून देण्यात यावी.
यासाठी एमआयडीसीचे अधिकारी व माण तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे मतही या वेळेला या प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!