शुभम शिर्के यांची असिस्टंट अधिकारी पदी निवड.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड…प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात आलेल्या सर्विस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेमधून शुभम मच्छिंद्र शिर्के यांची पोस्टल असिस्टंट अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
शुभम मच्छिंद्र शिर्के हा भाटकी गावचा रहिवाशी असून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवडचा माजी विद्यार्थी आहे. त्याने अभियांत्रिकी शाखेतून पदवी प्राप्त केली असून पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावरील सर्विस सिलेक्शन बोर्ड तर्फे घेतलेल्या परीक्षेतून त्याची पोस्टल असिस्टंट अधिकारी पदी निवड झाली आहे.
त्याच्या निवडीबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, क्रांतिवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर ज्येष्ठ नेते बबनदादा वीरकर ,, माजी पंचायत समिती सदस्य गोरख तात्या शिर्के, भाटकी गावचे सरपंच, चेअरमन, ग्रामस्थ , माण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ,तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभम शिर्के यांचे अभिनंदन केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!