अल्पसंख्यांक अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करून त्याची महाराष्ट्रात कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी. :गब्बार काझी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
मुस्लिम अल्पसंख्यक सुरक्षा कायदा लवकरात लवकर व्हावा व अल्प संख्या क समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करावी व मुस्लिम समाजाचया धार्मिक ठिकाणी हल्ले करणाऱ्या चया विरोधात कडक कायदा व्हावा मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे अशा विविध मागण्या साठी दिनांक 3/10/23 पासुन कराड येथील तहसिल कार्यालया पुढे समता पर्व समिती माध्यमातून मुस्लिम अल्पसंख्यक समाजातील कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत
अलिकडच्या काळात अल्प संख्याक समाजबांधवांवर होत असलेले हल्ले अत्याचार अन्याय या मुळे समाजात भितिचे वातावरण निर्माण होते आहे
या सर्व मागण्या साठी उपोषण करीत असलेल्या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्प संख्या क विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्प संख्या क सेलचे अध्यक्ष गब्बारभाई काझी व सर्व मुस्लिम बांधवांचा पाठिंबा कराड तहसिल कार्यालय येथे पत्र देऊन व उपोषण ठिकाणी हजर राहून जाहीर पाठिंबा दिला
उपोषणकर्त्यांच्या मागण्या :
चौकट:
» महाराष्ट्र मध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम संरक्षण कायदा होण्याबाबत…..
» महाराष्ट्र मध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी सारख्या कायद्याचे अंमलबजावणी होण्याबाबत…. …
»» भविष्यात महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिमसमाजावर होणाऱ्या हत्याकांडाच्या घटना रोखण्यासाठी दंगल विरोधी कायदा मॉब लिंचींग कायदा आणि अल्पसंख्यांक अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करून त्याची महाराष्ट्रात कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
» अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण लवकरात लवकर मिळावे.