घर दुरुस्तीच्या नावाखाली घरफोडी : दहिवडी पोलिसांची तत्पर कारवाई, 1.53 लाखांची रोकड जप्त

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी (ता. माण) – घर दुरुस्तीच्या कामासाठी बोलावलेल्या कामगाराने घरातील 1 लाख 53 हजार 600 रुपयांची चोरी केल्याचा प्रकार मलवडी (ता. माण) येथे 22 मे रोजी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत संशयित आरोपी दादासाहेब रामचंद्र जगदाळे (रा. शिरवली, ता. माण) यास अटक करून संपूर्ण रक्कम जप्त केली आहे.

या कारवाईस मा. तुषार दोषी (पोलीस अधीक्षक, सातारा), अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (फलटण/दहिवडी उपविभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.

फिर्यादी दशरथ रामु बोराटे (रा. मलवडी, ता. माण) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, घराच्या दुरुस्तीच्या कामासाठी त्यांनी दादासो जगदाळे, उत्तम जगदाळे आणि पप्पू बिहारी (पूर्ण नाव अज्ञात) यांना घरी बोलावले होते. 22 मे रोजी सकाळी त्यांची पत्नी आणि आई घरी होत्या. दुपारी दशरथ बोराटे घरी परतले असता, बेडमध्ये ठेवलेली 1.5 लाखाची रोकड आणि पत्नीच्या पर्समधील 3600 रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार, गुलाब दोलताडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलीस हवालदार नितीन धुमाळ, कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, महेंद्र खाडे व निलेश कुदळे यांनी तपासाची चक्रे फिरवली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दादासो जगदाळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करून जप्त केली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे करत आहेत. दहिवडी पोलीस ठाण्याच्या या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!