येळेवाडीत भर दिवसा घरफोडी; 3 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज लंपास
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी, प्रतिनिधी –
माण तालुक्यातील येळेवाडी (पोस्ट बिजवडी) येथे एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा धाडसी चोरी करुन घरातून एकूण 3,01,000 रुपयांचा ऐवज लंपास केला
या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी माण तालुक्यातील येळेवाडी (पोस्ट बिजवडी)येथील
भगवान बापूराव दडस (वय 55, व्यवसाय सेवानिवृत्त) यांच्या राहत्या घरात 13 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1.30 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचा कोयंडा आणि लाकडी दार तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट उचकटून चोरट्यांनी घरातील मोहन माळ (25 ग्रॅम) – 1,00,000 रुपये,लाखी ठुशी (6 ग्रॅम) – 24,000 रुपये
काळे मणी असलेले मिनी गंठण (12 ग्रॅम) – 48,000 रुपये,कानातील रिंगा (6 ग्रॅम) – 24,000 रुपये,कानातील वेल (15 ग्रॅम) – 60,000 रुपये,चांदीचे पैंजण, अंगठ्या इ. (25 भार) – 25,000 रुपये,रोख रक्कम – 20,000 रुपये असा एकूण 3,01,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.या बाबतची फिर्याद भगवान बापूराव दडस यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर 146/2025 आहे. संबंधित गुन्हा भारतीय नवसंहितेच्या (BNS) कलम 331(3), 305(a) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच DYSP अतुल सबनीस, प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली .आधिक तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहे.
सध्या आरोपी अज्ञात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.