म्हसवड पोलिसांची चमकदार कामगिरी – दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा उघड

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड:
म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने आणि प्रभावी तपास करून दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केवळ काही तासांतच आरोपींचा शोध घेऊन त्यांना पंढरपूर आणि कराड येथून ताब्यात घेतले. या धाडसी आणि जलद कारवाईमुळे म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.

म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोटेवाडी वरकुटे आणि वडजल या दोन ठिकाणी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. यशस्वी तपासानंतर अपहरण झालेल्या मुली आणि आरोपी पंढरपूर व कराड येथून शोधून काढण्यात आले.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अथक प्रयत्न केले. या पथकात प्रमुख भूमिका निभावणारे अधिकारी आणि कर्मचारी पुढीलप्रमाणे –

सहाय्यक पोलीस निरीक्षक – अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक – अनिल वाघमोडे, महिला पोलीस हवालदार – मैना हांगे, पोलीस नाईक – अमर नारनवर,पोलीस कॉन्स्टेबल – नवनाथ शिरकुळे, पोलीस कॉन्स्टेबल – अनिल वाघमोडे

म्हसवड पोलीस ठाण्यात नुकतेच दहिवडी पोलीस ठाण्यातून बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी या कामगिरीत महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगवान आणि प्रभावी तपास करत गुन्हेगारांना जेरबंद केले.

या जलद आणि यशस्वी तपासामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. म्हसवड पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!