म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – 24 तासात केबल चोरी उघडकीस

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, ता. माण :
शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारीसाठी लागणारी तब्बल 1500 फूट लांबीची थ्री-फेज मोटर केबल चोरीस गेल्याची घटना घडली होती. अवघ्या 24 तासांत म्हसवड पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून संपूर्ण चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

नवनाथ लुबाळ, रा. मासाळवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. दरम्यान, माळशिरस बाजूला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दोन्ही आरोपींना चोरीस गेलेल्या केबलसह ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी असे :

1. संजय महादेव दडस, रा. मासाळवाडी, ता. माण, सध्या रा. चादापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर
2. तुकाराम आप्पा लुबाळ, रा. मासाळवाडी, ता. माण, जि. सातारा

दोन्ही आरोपींकडून शंभर टक्के चोरीचा माल म्हणजेच 1500 फूट लांबीची थ्री-फेज मोटर केबल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत एपीआय अक्षय सोनवणे, पीएसआय अनिल वाघमोडे, शहाजी वाघमारे, नीता पळे, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले व महावीर कोकरे यांनी सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर डीवायएसपी रणजीत सावंत यांनी म्हसवड पोलीस ठाण्यास भेट देऊन अधिक माहिती घेतली. आरोपींनी इतर कोणते गुन्हे केले आहेत का, याबाबतचा तपास सुरू असून, महिला पोलीस हवालदार नीता पळे या तपास करीत आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *