व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गोंदवले खुर्द प्रतिनिधी: सादिक शेख
मायणी – मौजे चितळी येथे एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघा इसमांना वडूज पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाने अटक केली आहे. निर्भया पथक व वडूज पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी अटक करण्यात आली आहे.
दि. ३०/०८/२०२४ रोजी मौजे चितळी येथे एक अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिची छेडछाड करण्यात आली होती. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात २९१/२०२४ कलम ७४, ७५ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपींचा काही तासांत शोध घेतला. अटक केलेले आरोपी आहेत:अविनाश महादेव जाधव (वय १९ वर्षे) ,आर्यन दुश्यंत भिसे (वय १९ वर्षे) ,विजय दयानंद मदने (वय १९ वर्षे)
या आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या कारवाईमध्ये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पो.ह. नाना कारंडे, पो.कॉ. अजित काळेल, निर्भया पथकाचे पोलीस अमलदार पो.ना. सचिन जगताप, पो.कॉ. सागर पोळ, पो.कॉ. संजय जाधव, म.पो.कॉ. राजश्री खाडे, म.पो.कॉ. सुमाली घाडगे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. कांबळे हे करीत आहेत.
या तात्काळ कारवाईमुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.