बोरघर हवेली नुतन शाळा इमारतीचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
म्हसळा – सुशील यादव
तळा तालुक्यातील मौजे बोरघर हवेली येथे असलेल्या ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभ हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर बोरघर हवेली या शाळेचे मागील निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान होऊन शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती अशा वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे कोठे असा प्रश्न येथील संस्थाचालक व शिक्षक वर्गाला पडला असताना त्यांनी सामाजिक कार्यकर्ते,रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी क्षणाचाही विचार न करता मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक मंदार शर्मा यांच्या आर्थिक सहकार्याने शाळेची नवीन सुसज्य इमारतीचे बांधकाम पूर्ण करून तीचे उद्घाटन सोहळा रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आला.


