विद्यूत अॅम्युलिनिअम वायर चोरी : दोघांना अटक चोरीला गेलेला मुद्येमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ९०,हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त: बोरगांव पोलीसांकडून ३ दिवसात गुन्हा उघड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख पोलीस टाइम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द:
बोरगांव पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून दिनांक ०३/०६/२०२३ रोजी दाखल झालेला सुमारे ३०,००० /- रुपयांचा विद्युत अॅम्युलिनिअम वायर चोरीचा गुन्हा ३ दिवसात उघड केला असून यामध्ये २ आरोपी ना अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेली ३०,००० /- रुपयांची विद्युत अॅम्युलिनिअम बायर व गुन्हयात वापरलेली ६०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण ९०,००० /- रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.
सदरबाबत अधिक माहिती अशी की, सासपडे, ता जि सातारा गांवच्या हद्यीत वान्याची आळी ते मोटे डिपी या दरम्यान ५ गाळयातील बंद असलेल्या मेन लाईनवरून ३०,००० /- रुपये किंमतीची सुमारे २००० फूट विद्युत अॅम्युलिनिअम वायर ही दिनांक ३१/०५/२०२३ रोजीच्या रात्रीपासून ते दिनांक ०२/०६/२०२३ रोजीच्या सकाळी ९.०० वाजता या कालावधीमध्ये चोरीला गेली होती. याबाबत श्री अशोक चंद्रकांत फाळके, प्रधान तंत्रज्ञ, नागठाणे ता जि सातारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरगांव पोलीस ठाणेमध्ये अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातारा जिल्हा पोलीस आस्थापनेवर अशा प्रकारचे अनेक विद्युत अॅम्युलिनिअम वायर व डी पी चोरीचे अनेक गुन्हे घडलेले असल्यामुळे बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री तेलतुंबडे यांनी पोलीस ठाणेकडील डी बी पथक व तपासी अंमलदार यांना गुन्हयाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन करून योग्यत्या सुचना दिल्या. तसेच स्वत;देखील गोपनीय खबऱ्यांकडून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बोरगांव पोलीस ठाणेचे डी बी अंमलदार पोलीस नाईक दादा स्वामी, बाळासाहेब जानकर गुन्हयाचे तपासी अंमलदार पोलीस नाईक म्हेत्रे यांनी अतीशय बुध्दी कोशल्याने तपास करून गोपनीय बातमीदाराकरवी खात्रीशीरपणे माहिती प्राप्त करून घेतली. व त्यामध्ये हर्षद राजेंद्र डांगे व तुषार सुरेश जाधव दोघे रा. सासपडे, ता जि सातारा यांचा सदर गुन्हयात सहभाग निष्पन्न केला. दोन्ही आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तसेच आरोपीकडून गुन्हयात चोरीस गेलेली ३०,००० /- रुपये किमतीची व सुमारे २००० फूट लांबीची विद्यूत अॅम्युलिनिअम वायर तसेच आरोपीनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन ६०,००० /- रुपये किमतीची बजाज कपनीची सीटी १०० मॉडेलची मोटार सायकल असा ९०,००० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या उकल व तपासकामी मा. पोलीस अधीक्षक सो सातारा श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक  सातारा  बापू बांगर, . उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग  सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले असून बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि  तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस ठाणेचे  अंमलदार पोलीस नाईक दादा स्वामी, बाळासाहेब जानकर पोलीस नाईक अमोल सपकाळ, व पोलीस नाईक विजय म्हेत्रे हे सदर तपास पथकामध्ये आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!