बोनेवाडी कुस्ती मैदानात पै. तानाजी विरकरने पै. अनिल बामणेवर बाजी मारली
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्यातील बोनेवाडी म्हसवड येथील नालबंद्या यात्रेनिमित्त जयविजय गणेश मंडळाने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. गणेश कुंकुले व पै. पृथ्वीराज मोहोळ बरोबरीत सुटली . एक लाख ५९ हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. हे बक्षीस आकाश विजय सातपुते यांच्या वतीने लावण्यात आले होते.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै तानाजी विरकरने पै. अनिल बामणला चितपट केले. त्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस माजी उपनगराध्यक्ष धनाजी माने यांच्या वतीने लावण्यात आले होते. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. सागर तामखडेने पै. सतपाल सोनटक्कवर वर मात केली. त्यास ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस गंगाराम आबा विरकरयांच्या वतीने लावण्यात आले होते. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. विशाल राजगेने पै. दत्ता बोडरे वर मात केली आहे. त्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस लिंगाप्पा ज्योती सारुख यांच्या वतीने लावण्यात आले होते.
याशिवाय या कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब पुकळे , अरुण विरकर , बबनदादा विरकर , विजय बनगर , पै. संजय दिडवाघ , धनाजी माने , तुकाराम विरकर , विजयशेठ सातपुते , दिलीप खोत , पोपट विरकर , लिंगाप्पा सारुख, नारायण विरकर , शिवाजी विरकर , भिमाजीशेठ विरकर , मधुशेठ विरकर , तात्यासाहेब घुटुकडे व जयविजय गणेश मंडळ यात्रा कमिटी प्रयत्न केले. पंच म्हणून वस्ताद रावसाहेब मगर, वस्ताद शिवाजी दिडवाघ , वस्ताद रावसाहेब कोळपे , वस्ताद पोपट रूपनवर, वस्ताद महालिंग खांडेकर, पै. संजय दिडवाघ , पै. बाळासाहेब काळे , पै. सतीश दिडवाघ, पै. नवनाथ खांडेक , विलास रूपनवर , लुनेश गोरड , नारायण बाड , विशाल जाधव, राजू विरकर , दिलीप वीरकर यांनी काम पाहिले. यावेळी कुस्ती निवेदक परशुराम पवार समालोचन केले .