विविध शारीरिक व्याधीसाठी इंजि सुनील पोरे यांनी आयोजीत केलेल्या या आरोग्य शिबीराचा नागरीकांना चांगला फायदा होणार : विजय सिन्हा
व्हिजन२४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
म्हसवड शहरात पोरे कुटुंबिय नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते, कधी महिलांसाठी ते वेगळे व्यासपिठ निर्माण करतात तर कधी रक्तदान शिबीर भरवत असतात, म्हसवडकरांची नेहमी सेवा करण्यासाठी तत्पर असलेल्या या कुटुंबाने नागरीकांची सेवा म्हणुन नेत्र तपासणी शिबीरांचेही यापुर्वी आयोजन केले आहे, आज मात्र त्यांनी विविध शारीरिक व्याधीसाठी आयोजीत केलेल्या या शिबीराचा नागरीकांना चांगला फायदा होणार यात अजिबात शंका नाही
सुनील पोरे करत असलेले सामाजिक काम खरोखर वाखाणन्यासारखे आहे भले तुमचा समाज छोटा असलातरी तुम्ही करत असलेले काम मोठे आहे तुम्ही शेतीच्या पाण्यासाठी केलेले उपोषण फोरलेन हायवे काम सुरु करण्यासाठी केलेले उपोषणे व ते पूर्नत्वासाठीची धडपड हा समाजापुढे एक आदर्शच असल्याचे मत म्हसवड चे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी व्यक्त केले.

येथील श्री. संत नामदेव मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे व नामदेव समाजोन्नती परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नागरीकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शुभम भारत गँसचे प्रमुख इंजि. सुनील पोरे, थेरीपी तज्ञ दत्तात्रय कोकरे, प्रमोद पोरे, संदिप नामदास, पत्रकार अहमद मुल्ला,विजय टाकणे, पोपट बनसोडे,महेश कांबळे,सचिन मंगरुळे, अश्विनी फुटाणे, नामदेव चांडवले, दिपक फुटाणे, सुनीता पोरे, गिरीश पोरे, चंद्रकांत पोरे,जेष्ठ वकील महादेव डोंबे, महेश काळभैरव ,करण पोरे,शुभम पोरे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंजि.सुनील पोरे म्हणाले आज नासपची स्थापना होऊन ११६ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते त्यानुसार आम्ही म्हसवड मध्ये बोन सेटिंग आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे विविध शारीरिक व्याधीसाठी आयोजीत केलेल्या या शिबीराचा नागरीकांना नक्की फायदा होणार आहे, वयाच्या चाळीशीनंतर खऱ्या अर्थाने अनेकांना विविध शारीरिक व्याधी सतावतात त्यावर वेळीच उपचार न झाल्यास त्या व्याधी अधिक बळावतात त्यामुळे अशा प्रकारच्या आरोग्य शिबीरात प्रत्येकाने सहभागी होवुन आपली शारीरिक व्याधी तपासणे गरजेचे आहे, यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधींपासुन आपली सुटका होवु शकते
सदर आरोग्य शिबीरामध्ये रुग्णांची सायटिका, मायग्रेन, टाचदुखी, रोगप्रतिकारशक्ती, गुडघेदुखी, वात-मायग्रेन, टाचदुखी, रोगप्रतिकारशक्ती, गुडघेदुखी, वात- संधीवात, डोके दुखी, कॅल्शियमची कमी, कंबर दुखी व शरीरावरील कोणत्याही प्रकारची सुज येणे आदींची मोफत तपासणी करून तज्ञ दत्तात्रय कोकरे, अतुल फुटाणे व नामदेव चांडवले यांचे मार्फत त्यांच्यावर जागेवरच मोफतपणे उपचार ही केले जाणार असल्याचे श्री पोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभम पोरे यांनी केले
चौकट –
या शिबीरात ज्या रुग्णांवर उपचार करण्यात आले त्यांनी लगेच चांगलाच फरक पडल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या शिबीरात जवळपास 125 रुग्णांनी सहभागी होत आपलेवर उपचार करून घेतले. व इंजि सुनील पोरे यांना धन्यवाद दिले
प्रतिक्रिया –
बोन्स सेटिग कलारी मेथडचा निश्चीत फायदा – प्रमोद पोरे-
म्हसवड येथे आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीरामध्ये रुग्णांवर बोन्स सेटिंग कलारी मेथडचा वापर होणार असल्याची माहिती आपणाला मिळाल्याने मी या शिबीरात सहभागी होण्यासाठी सांगली येथुन आलो आहे, येथे उपचार घेतल्यावर माझ्या शारीरिक व्याधींना तात्काळ फरक पडला असुन अशा प्रकारच्या आरोग्य शिबीराचे नेहमी आयोजन व्हावे.
पत्रकार पोपट बनसोडे –
या बोनसेटिंग कलारी मेथड उपचारामुळे माझी पाठ व कंबरेचे अनेक दिवसाचे दुखने ८० टक्के कमी झाले असून जडपणा जाऊन हलके हलके वाटू लागले उपचार घेऊन खरोखर मी समाधानी झालो असून श्री पोरे साहेब यांना धन्यवाद देतो