बोलेरो पिकअपची मोटार सायकलला पाठीमागुन धडक  एक ठार दोन जखमी 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
     येथिल प्रकाश मानिकराव गायकवाड राहणार म्हसवड (मुळ गाव कारखेल ) हे इंदापूर येथिल आपल्या बहिणीला भेटून आपल्या हिरो होंडा स्लेंडर मोटार सायकलने   त्यांची पत्नी सुवर्णा गायकवाड व मुलगा राहुल गायकवाड सह  म्हसवड कडे परत येत असताना संध्याकाळी साडे सात वाजणेच्या सुमारास माळशिरस म्हसवड चौकाजवळील पेट्रोल पंपाजवळील श्रीनाथ हॉटेल जवळ पाठीमागुन भरधाव येत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीने जोरात धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की  या अपघातात मोटार सायकल वर असलेले प्रकाश गायकवाड  व मुलगा राहुल गायकवाड  हे गंभीर जखमी झाले तर  त्यांची पत्नी सुवर्णा गायकवाड या जागेवरच मयत झाल्या 
           अपघातानंतर बोलेरो चालक घटना स्थळावरुन पळून गेला याबाबत बोलेरो पिकअप चालका विरुद्ध प्रकाश गायकवाड यांचे भाऊ अॅड.विलास मानिकराव गायकवाड राहणार म्हसवड (मुळ गाव कारखेल ) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन  या अपघाताचा गुन्हा  म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. या अपघाता बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
मंगळवार दि २५ रोजी रात्रौ ७:३० वाजता. मौजे म्हसवड गावचे हद्दीत म्हसवड ते माळशिरस रोडवर श्रीनाथ हाँटलचे समोर  बोलेरे पिकअप एम एच ४५ ए एफ १९६०  वरिल चालक नाव पत्ता माहित नाही याने   रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीगने अविचाराने चालवुन हिरो होंडा स्पेल्डंर एम एच ११ सी एल ८३०६ ह्या मोटरसायकल ला पाठीमागुन धडक देवुन अपघात करुन अपघातातील जखमीस उपचारा करिता रुग्णालयात दाखल न करता अपघाताची खबर न देता पऴुन गेला झाले अपघातात  फिर्यादीचा भाऊ प्रकाश ,फिर्यादीचा पुतण्या राहुल यांचे  गंभिर दुखापतीस व फिर्यादीची भावजय सुवर्णा प्रकाश गायकवाड हिचे मृत्युस कारणीभुत झालेला आहे.म्हणुन माझी बोलेरे पिकअप चालका विरूद्ध तक्रार आहे.  वगैरे मजकूरचे खबरी वरून गून्हा रजिस्टरी दाखल करणेत आला असून सदर गून्ह्याचा ईमेल वरीष्ठांना पाठवणेत आला असून सदर गून्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.हू कोर्टात पाठवणेची तजविज ठेवली आहे. अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली   एस.एस.जाधव पोलीस  ब नं २२९   म्हसवड पोलीस ठाणे  मो.नं  9867799612 हे करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!