कापील गावात बोगस मतदान सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचा आरोप

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी

2024 विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानाचा मुद्दा गाजला होता विरोधकांनी निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करत आंदोलने छेडले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील कापील गावात बोगस मतदानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गावात वास्तव्यास नसलेल्या काही लोकांनी कापील गावच्या पत्त्यावर बनावट आधार कार्ड तयार करून मतदान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर प्रकरणावर आज ग्रामस्थांनी एकत्र येत तहसीलदार कार्यालय कराड येथे धरणे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी छेडले आहे.

ग्रामस्थांच्या व गणेश पवार यांच्या आरोपानुसार कापील गावाशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांनी येथे मतदान नोंदणी करून मतदान केलं, या बोगस नोंदणी मागे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांची मागणी अशी आहे की

१) अशा बनावट मतदाराविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत

२) तसेच मतदान अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कराड यांनी चौकशी करून जबाबदारावर कारवाई करावी

३)बाहेरगावचे लोक बनावट आधार कार्ड करून येथे मतदान करत आहेत याचा आम्ही पुरावा दिला आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार व गावकऱ्यांनी याप्रसंगी दिला आहे.

याशिवाय ग्रामस्थांनी संजय गांधी योजनेचे तत्कालीन अव्वल कारकून यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत त्यांना कोणताही आदेश नसताना निवडणूक शाखेत काम करत चुकीच्या नोंदी केल्यामुळे त्यांच्यावर निलंबन व खातेनिहाय चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

कापील गावातील हे आंदोलन आता प्रशासनाच्या दारावर येऊन पोहोचले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तरच गावातील लोकांना निवडणूक प्रक्रियेवर विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *