बंधाऱ्यात बुडालेल्या हणमंत शेंबडेचा मृतदेह सापडला; पालकांच्या हंबरड्याने वातावरण झाले भावूक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

म्हसवडच्या शेंबडे वस्ती येथे बंधाऱ्यात बुडालेल्या हणमंत मोहन शेंबडे (वय २१ वर्ष )या युवकाचा मृतदेह अखेर सापडला आहे. म्हसवड नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलाच्या मृत्यूने पालकांच्या आक्रोशाने सर्वांची मने हेलावली.

हणमंत, जो मुकबधीर होता, आपल्या आई-वडीलांसोबत शेंबडे वस्तीवर राहत होता. तो सातार्‍यातील एका विशेष शाळेत शिक्षण घेत होता. गणपतीच्या सुट्ट्यांसाठी गावी परतलेल्या हणमंताने दि. १५ रोजी विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी पैलतीर गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीच्या मधोमध असताना रस्सीवरून त्याचा हात निसटला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत असतानाही घाबरल्यामुळे हणमंताला स्वतःला वाचवता आले नाही, आणि तो प्रवाहात वाहून गेला.

त्याच्या आईने हताशपणे घरी धाव घेत पतीला इशाऱ्यांतून ही घटना सांगितली. याची खबर म्हसवड पोलीसांना व म्हसवड नगरपालिकेला कळवली. सदर ची माहिती मिळताच म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सखाराम बिराजदार हे दोघेही आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, गावातील लोकांच्या मदतीने शोध मोहीम रात्रभर सुरू ठेवण्यात आली, मात्र हणमंताचा मृतदेह हाती लागला नाही. अखेर, दुसऱ्या दिवशी सकाळी, आपत्ती व्यवस्थापन पथकाने पाण्यात उतरून तासाभराच्या शोधानंतर मृतदेह बाहेर काढला.
पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकात
सागर सरतापे, गणेश चव्हाण, दिपसागर सरतापे, धिरज खंदारे, प्रवीण पिसे, दादासाहेब सरतापे, निसार मुल्ला, रज्जाक शेख, संजय जाधव आदींनी सहभागी होत
बोटीद्वारे व पाण्यात उतरुन बुडालेल्या हणमंताचा शोधून काढले

सादर घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा तपास सपोनि सखाराम बिराजदार यांचे मार्गदर्शनाखाली एस.एच वाघमारे सहायक पोलीस फौजदार करत आहेत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!