नामदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फौंडेशन म्हसवड यांचे सौजन्याने म्हसवड मध्ये भव्य रक्तदान शिबीर

बातमी Share करा:

म्हसवड-(अहमद मुल्ला )
      नामदेव समाजोन्नती परिषद सातारा  व जनश्री फौंडेशन म्हसवड यांचे सौजन्याने; मे.शुभम भारत गॅस एजन्सी म्हसवड यांच्या सहकार्याने म्हसवड मध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे नासप सातारा व जनश्री फौडेशनचे म्हसवडचे अध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांचेकडून सांगण्यात आले  राज्यातील रक्ताचा तुटवडा व काळाची गरज ओळखून दि ८ जानेवारी २०२३ रविवार रोजी म्हसवड येथील संत नामदेव मंदिर कोष्टी गल्ली येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत हे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.  यावेळी रक्त  दात्याला  आकर्षक भेट  वस्तु स्वरूपात देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आव्हान  पोरे यांनी केले आहे
तसेच रक्तदान करणारास स्वत: साठी रक्ताची आवश्यकता भासलेस आयुष्यभरासाठी रक्त मोफत मिळेल आणि त्यांचे नातेवाईकास रक्त लागलेस दोन वर्षापर्यंत   एक बॅग   रक्त मोफत मिळेल त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्याचे मित्र परिवारास रक्त लागलेस सवलतीचे दरात उपलब्ध होईल…
रक्तदात्यांनी आपली नाव व नोंदणी खालील नंबर वर करावी
 शुभम भारत गॅस एजन्सी          ७८८८०२११११
अतुल फुटाणे मेन रोड              ८१७७९३७७३७

जगदीश पोरे जैन मंदिर जवळ  ८००७४१९८९५
 “रक्तदान ही जनसामान्यांची सेवा यालाच मनुष्य इश्वर सेवा “
जास्ती जास्त नागरीकांनी या  रक्तदान शिबीरात सामील  व्हावे असे आवाहन इंजि सुनील पोरे यांनी केले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!