गोपालकृष्ण विद्यालयातील अंध विद्यार्थ्याने मिळवले उत्तम यश*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी

विलास गेंड यांनी अंधत्वावर मात करून एस. एस. सी. मार्च २०२४ परीक्षेत मिळवले उत्तम्म यश.
अगदीं धडधाकट व्यक्तींना सुद्धा स्वतःच कर्तृत्व सिद्ध करताना अनेक अडचणी येतात. मात्र एका अंध व्यक्तींने इयत्ता १० वी च्या परीक्षेत यश संपादन करून कितीतरी येणाऱ्या अडचणींवर मात करता येते हे सिद्ध करून दाखवले.

       मनकर्नवाडी हद्दीत असलेली लोणार वस्ती तालुका माण जिल्हा सातारा येथील रहिवासी विलास महादेव गेंड ही व्यक्ती अंध असताना सुद्धा अंधत्वावर मात करत या युवकांने रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द तालुका माण विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा दिली व ६२ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. हे यश मिळविण्या साठी विद्यालयातील मुख्याध्यापक मा.श्री. नदाफ एन. डी. सर श्री.दयानंद जगदाळे सर, आणि विलास ला या सगळया प्रक्रियेत सर्वोतोपरी सहकार्य करणारे श्री. सादिक शेख सर, व सर्व शिक्षक सहकारी यांचे सहकार्य लाभले.आई एका डोळ्याने अंध,बहीण अंध, तसेच परिस्थिती हलाकीची असून सुध्दा सगळ्या गोष्टीवर मात करून मिळवलेले यश हे साध आणि सोपं नाही. उत्पन्नाचे दुसरे कुठले साधन नाही म्हणून विलास खचला नाही विलासने या सगळया अडचणींवर मात करून लातूरला एक वर्षाचा ॲक्युप्रेशर मसाजचा कोर्स केला आणि त्याच्या माध्यमातून गेले दोन वर्षे विलास आपल्या उत्पन्नाचे व उदर निर्वाहाचे साधन स्वतःच बनलेला आहे. विलासला अनेक सेवाभावी संस्थांनी मदत करणे गरजेचे आहे. तर त्याचा आणखी विकास होऊ शकतो.

      लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हसवड केंद्रातून बी. ए. शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विलासला रेल्वे भरतीतील विवीध पदांची परीक्षा द्यायची असल्याने दहावीची परीक्षा पास होणे गरजेचे होते त्यामुळे त्याने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला यातून सतरा क्रमांकाचा फॉर्म भरला आणि अभ्यासाला सुरुवात केली. रोज पहाटे अभ्यास सुरू केला परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी गोपालकृष्ण विद्यालयात इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेला सुजल चव्हाण याची विद्यालयाच्या वतीने रायटर म्हणून मदत मिळाली आणि २०२४ च्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ६२% गुण मिळवून यश संपादन केले.

      डोळस लोकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या विलास च्या या यशाबद्दल शिक्षण विभाग अधिकारी , संस्था पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नदाफ एन. डी.सर विलास ला विशेष सहकार्य करणारे श्री.सादिक शेख सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती आणि यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी विलासचे हार्दिक अभिनंदन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!