म्हसवड येथे भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ, हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांचा उत्साह

बातमी Share करा:

 

(व्हिजन 24तास न्यूज संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड :प्रतिनिधी 

करणभैय्या सुनील पोरे मित्र समूहाच्या वतीने आयोजित भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभात मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम सौ. सोनिया गोरे (मा. ना. जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी) यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. सुवर्णा पोरे, सौ. अंजली भागवत, राजलक्ष्मी पोरे, अँड. गौरी पोरे आदींचा समावेश होता. महिलांनी हळदी-कुंकवाच्या माध्यमातून एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत पारंपरिक उत्साहाने हा सण साजरा केला.

या कार्यक्रमादरम्यान भाजप सदस्यता अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट करत महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक रंगला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणभैय्या सुनील पोरे मित्र समूहाच्या सहकार्याने बाळासाहेब पिसे, बाबू मुल्ला, सागर चव्हाण, विकास लोखंडे आणि सौ. पानसंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन अँड. शुभम पोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे जोरदार कौतुक केले असून, भाजप सदस्यता अभियानाच्या यशस्वीतेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!