माढा मतदार संघात अभयसिंह जगताप यांच्या  कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड

–              संक्रांती निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वतीने शनिवारी आयोजित ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम अनपेक्षितरीत्या दोन दिवस घेतला गेल्याने महिलांसाठी पर्वणी ठरला. विविध आकर्षक बक्षीसांसह या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेला पैठणीचा मान मिळाल्याने अभयसिंह जगताप हे प्रत्येक महिलेचे हक्काचे भाऊ ठरले आणि त्यांच्या नावामागची ‘दादा’ ही उपाधी सर्वार्थाने सार्थ ठरली आहे.

              आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांचे नाव जवळजवळ निश्चित असून सातारा जिल्ह्यात अभयसिंह जगताप यांच्याकडून होणा-या विविध समाजोपयोगी उपक्रमांची व्याप्ती संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात वाढत चालली आहे. याचाच एक भाग म्हणून महिलावर्गाची विशेष पसंती असलेल्या क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे ठिक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

            शनिवारी सायंकाळी महिलावर्गाच्या प्रचंड प्रतिसादात हा कार्यक्रम करमाळ्यात सुरू झाला. परंतु हा कार्यक्रम ऐन रंगात आला असताना करमाळा पोलिसांनी वेळेचे बंधन पाळत हा कार्यक्रम बंद केल्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित महीलावर्गाच्या आनंदावर विरजण पडले. अनेक उत्साही महिलांनी पुढे होऊन अभयसिंह जगताप यांना हा कार्यक्रम पूर्ण घेण्यासाठी आग्रह धरला होता. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या जगताप यांचा या ठिकाणी नाइलाज झाला.‌ अनेक विनंत्या करूनही हा कार्यक्रम पुढे चालणार नाही, असे गृहीत धरून शेवटी महीलाभगिनींनी घरचा रस्ता धरला. मात्र महिलांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेले कार्यक्रम स्थळ क्षणात रिकामे झाल्याची सल अभयसिंह जगताप यांना होती.

         याबाबत रात्रीत त्यांनी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप, युवक शहर अध्यक्ष अमीर तांबोळी, युवक तालुका अध्यक्ष केशव चोपडे, समाधान शिंगटे, सचिन नलवडे, किसान सेल तालुका अध्यक्ष रवी घाडगे, तालुका उपाध्यक्ष इरशाद पठाण यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, जयमाला चौरे, महिला आघाडी शहर अध्यक्षा राजश्री कांबळे, तालुका अध्यक्षा नलिनी जाधव आदींशी चर्चा करून रविवारी पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले.

        रविवारी झालेल्या या कार्यक्रमाचे पहिले बक्षीस होंडा एक्टिवा केतुर नं.१(ता.करमाळा) येथील सुषमा महेंद्र कोकणे, दुसरे बक्षीस फ्रीज देवीचा माळ (ता.करमाळा) येथील शीतल श्रीकांत चव्हाण, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही चिकलठाण (ता.करमाळा) येथील माधवी गणेश बारकुंड तर आटा चक्कीचे चौथे बक्षीस करमाळा येथील कृष्णाजी नगरच्या तृप्ती रणजीत सुकळे यांनी पटकावले.

         अनपेक्षितपणे रविवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा घेतलेल्या या कार्यक्रमाला महिलावर्गाने शनिवार इतकीच उपस्थिती दर्शविली आणि रात्री दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय सोमवारी असलेल्या संक्रांतीच्या सणाला लाडक्या अभयदादांकडून मिळालेली पैठणी आवर्जून परिधान करून खासदार म्हणून अभयसिंह जगताप यांनाच पसंती असल्याची जणू पोचपावतीच दिल्याचे दाखवून दिले.

कोट

अभयसिह जगताप –

* आजचे सरकार महिलांचा अनादर करणारे   महिलांचा मानसंमान न करणारे, महिलांवर अनेक निर्बंध घालणारे ,महिलांना कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध न करुन देणारे, जुलमी  सरकार असून सरकारला धडा शिकवण्यासाठी नारीशक्तीला एकवटायला लागेल

* येणाऱ्या काळात मी महिलांसाठी,महिला बचतगटासाठी प्रामाणिक पणे काम करेन महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देईन महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी मी पूरेपुर प्रयत्न करेन ,सर्व महिलांना अभय देण्याचे काम माझ्याकडून होईल माझे नावच अभय आहे. येणाऱ्या काळात  विचार करून निर्णय घ्या २०२४ मघ्ये कशा प्रकारचे सरकार पाहिजे याची निवड करा


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!