मासाळवाडीतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – मंत्री जयकुमार भाऊ यांच्या प्रयत्नातून 100 केव्ही ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड: प्रतिनिधी
मासाळवाडी (ता. माण) येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपासाठी अत्यावश्यक असलेली वीजपुरवठ्याची अडचण आता दूर झाली आहे. मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून 100 केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर (अतिरिक्त डीपी) मंजूर करून घेण्यात आला असून, त्याचे आज सकाळी मासाळवाडी (धोंड्याचा मळा) येथे ग्रामस्थांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

उद्घाटन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
या प्रसंगी म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ,उपनगराध्यक्ष नारायण मासाळ
माजी सोसायटी संचालक सुखदेव मासाळ
ज्ञानेश्वर मासाळ, पांडुरंग मासाळ, डॉ. सतीश मासाळ तसेच परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.


शेतकऱ्यांची गरज ओळखून तातडीने कार्यवाही

शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी वीजपुरवठा हा कायमच जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला आहे.
धोंड्याच्या मळ्यातील अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी शेती पंप चालवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते.
हीच गरज लक्षात घेऊन मंत्री जयकुमार भाऊ यांनी तत्काळ वीज वितरण विभागाकडे पाठपुरावा केला आणि अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला.

आज त्याचे यशस्वी लोकार्पण झाले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!