म्हसवडचे भूमिपुत्र आणि वरिष्ठ तंत्रज्ञ . श्री सुहास ( दिनेश) दिलीप डमकले यांना गुणवंत कामगार पुरस्कार
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
महावितरण (MSEB) बारामती परिमडल सातारा मंडल वडूज विभाग यांनी 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून म्हसवड ग्रामीण येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन नियुक्तीस असलेले श्री. सुहास ( दिनेश) दिलीप डमकले रा. म्हसवड यांना गुणवंत कामगार पुरस्काराने बारामती परिमंडळ स्तरावर मुख्य अभियंता याच्या हस्ते गौरविण्यात आले आहे आपल्या कामातून महावितरण साठी भरीव योदानाबद्दल तसेच मोलाचे सहकार्य ग्राहकाभिमुख सेवा पुरवल्या बद्द्ल व आपल्या कामातून महावितरण ची जनमानसात प्रतिमा उंचवन्यात त्याचे मोलाची सेवा दिली म्हणुन सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यां कमी त्यांना वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता मुंडे साहेब माण तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता श्री डावरे साहेब आणि शहर अभियंता श्री. तायडे साहेब, ग्रामीण अभियंता थोरात साहेब यांचे आणि सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. सुहास ( दिनेश) दिलीप डमकले यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल म्हसवड नगरीत सर्व स्थरातून त्यांचे अभिनदन करण्यात येत आहे
चौकट
पंकज गोंजारी उपकार्यकारी अभियंता महावितरण:
“कामाचा ताण असताना ग्राहकांशी हसत मुखाने आणि त्यांच्या समस्या समजुन घेत मेंटेनन्स, वीजबील थकबाकी वसुली, देखभाल दुरुस्ती अखंडित वीजपुरवठा याकडे विशेष लक्ष दिल्याने विभागीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला हा आदर्श निश्चित ईतर कामगारांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.”