तळबीड येथे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व भव्य भाजपा प्रवेश मेळावा उत्साहात

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज,संपादक अहमद मुल्ला
तळबीड (ता.कराड), दि. १ :
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या ऐतिहासिक जन्मभूमी तळबीड येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि भव्य भारतीय जनता पार्टी प्रवेश मेळावा उत्साहात पार पडला.

    राज्य सरकारच्या विशेष प्रयत्नातून तळबीड गावासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी परिसर सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांचे काम आणि इतर ग्रामविकास उपक्रम राबवले जाणार आहेत.

     कार्यक्रमापूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.

         यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (कराड दक्षिण), आमदार मनोज घोरपडे (कराड उत्तर), भाजप जिल्हा माजी अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, प्रदेश किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, उंब्रज मंडळ अध्यक्ष योगीराज सरकाळे, मा. जि.प. सदस्य सागर शिवदास तसेच सरपंच सौ. मृणाली मोहिते आणि उपसरपंच सौ. संगीता मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

             या कार्यक्रमादरम्यान विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री गोरे यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

       तळबीड परिसरात शिवकालीन परंपरेला आणि विकासाला नवा वेग देणारा हा कार्यक्रम ठरला असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयकुमार गोरे यांच्या विकासदृष्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *