प्रांताधिकारी सुर्यवंशी यांची भाटकी गावाला सदिच्छा भेट
शैलेश सुर्यवंशी (उपविभागीय अधिकारीसो माण-खटाव उपविभाग दहिवडी )यांनी मौजे भाटकी या गावास भेट दिली. या वर्षी भाटकी परिसरात पाऊस खूप कमी झालेने संभाव्य पाणी टंचाई संदर्भात सुर्यवंशी यांनी भाटकी गावास सदिच्छा भेट दिली.
यावेळी माननीय उपविभागीय अधिकारीसो यांनी श्री गोरखतात्या शिर्के यांच्या शेताची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत भाटकी येथे भाटकी ग्रामस्थ व शेतकरी यांना ई पीक पाहणी, शासकीय महसूल वसुली, मतदान कार्ड आणि आधार कार्ड नंबर जोडणी करणेबाबत ग्रामस्थांना आवाहन केले. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
तसेच शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामाची ई पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रांतअधिकारीयांना शब्द दिला. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन महसुल पात्र शेतकरी खातेदार यांनी आपली रक्कम तलाठी यांचेकडे जमा केली. सदर सभेसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत भाटकी, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.