भाटकी गावातील निसर्गप्रेमी पोलीस पाटलांच्या दक्षतेमुळे कोल्ह्याचा जीव वाचला

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
               भाटकी ता माण गावच्या हद्दीत वनक्षेत्राजवळ असलेल्या लक्ष्मण मारुती शिर्के यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचा भाटकीच्या निसर्ग प्रेमी पोलीस पाटील सौ हर्षदा अजित शिर्के यांच्या दक्षतेमुळे व वनविभागाच्या  मदतीने  जीव वाचवण्यात यश आले 
             माण तालुक्यात यावर्षी  पाऊसाने हुलकावणी दिल्यामुळे  सर्वत्र भयानक दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून याचा फटका वन्यप्राण्यांना देखील बसला आहे जंगलातील पानवठे आटले असल्यामुळे  पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.
 
             असाच एक कोल्ह्यांचा कळप या परिसरात आला होता. या कळपातील एक कोल्हा शनिवार दि २८ रोजी संध्याकाळी   चुकून  लक्ष्मण मारुती शिर्के यांच्या विहिरीत पडला होता  याबाबतची माहीती लक्ष्मण शिर्के यांनी    भाटकीचे पोलीस पाटील  सौ हर्षदा अजित शिर्के  यांना दिली व सांगीतले की आमच्या मालकीच्या विहीरीत एक कोल्हा पडला असून विहीर खोल आहे पाणीही कमी आहे विहीरीला पायऱ्या नसल्यामुळे त्याला वर येता येत नाही कसेही करुन या मुक्या प्राण्याचा जीव वाचवावा अशी विनंती केली त्याक्षणी पालीस पाटील सौ.हर्षदा शिर्के  व ग्राम सुरक्षादल भाटकी यांनी   घटनास्थळी धाव घेतली व  त्वरीत अजित शिर्के यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार दहिवडी वनविभागाला फोन वरुन या बाबतची माहिती दिली  खुपच रात्र झाल्यामुळे काहीच करता येत नसल्यामुळे दहिवडी वनविभागाने  सकाळी बारामतीच्या रेस्क्यू टिमला तातडीने बोलावून घेतले तोपर्यंत दहिवडीचे वनपाल जाधव व म्हसवडचे वनरक्षक मनिषा केंद्रे मॅडम व वनकर्मचारी महादेव जाधव अतुल मोहीते तसेच भाटकीचे ग्रामस्थ शरद शिर्के, राहुल रकटे, ब्रम्हदेव शिर्के, रमेश शिर्के, अशोक शिर्के, अनिल शिर्के, सुनिल पोळ, किरण शिर्के, बाळू कोळेकर  व ग्रामस्त सकाळी सहा वाजल्यापासून घटना ठिकाणी ऊपस्थित होते
  साधारण सकाळी ९ वाजनेच्या दरम्यान बारामतीवरून  रेस्क्यू  टिम दाखल झाली त्यात बारामती चे श्रेयस कांबळे , ऋषिकेश मोरे,म्हसवडचे वनपाल जाधव , वनरक्षक म्हसवडच्या मनिषा केंद्रे मॅडम वनकर्मचारी महादेव जाधव , अतुल मोहिते यांनी आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून कोल्ह्याला  सुरक्षित बाहेर काढले. घाबरलेल्या व थंडीने गारठलेल्या कोल्ह्याची  सर्व प्राथमीक तपासणी करून वनातील निवासस्थानी  सुरक्षित सोडण्यात आले
       तात्काळ वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गारठलेल्या कोल्ह्याला  विहिरीच्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले. या प्रसंगी बारामती चे श्रेयस कांबळे , ऋषिकेश मोरे,म्हसवडचे वनपाल जाधव , वनरक्षक म्हसवड मनिषा केंद्रे मॅडम वनकर्मचारी महादेव जाधव , अतुल मोहिते यांनी मोलाची सहकार्य केले. यावेळी शेत शिवारातील शेतकरी उपस्थित होते. कोल्ह्याला जीवदान मिळाल्याने वन विभागाचे तसेच पोलीस पाटील  सौ.हर्षदा अजित शिर्के  यांचे  कौतुक करण्यात येत आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!