दि.१५ रोजी गाव चलो अभियान संदर्भात कामगार मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्री तेजसदादा जमदाडे यांनी उंब्रज मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास सहकुटुंबासहित भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी धनश्री ताई, छोटे चिरंजीव व त्यांच्या मातोश्री आल्या होत्या.
त्यावेळी कराड उत्तरच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष सौं वैशालीताई मांढरे यांनी त्यांच्या कुटुंबाच मोट्या आनंदाने औक्षण करून स्वागत केल. त्यानंतर सन्माननीय जमदाडे साहेबांनी आलेल्या सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली व त्यांना मोलाचं मार्गदर्शनही केल. तसेच जाता जाता त्यांनी तुमच्या सर्व अडचणी आपण सोडवू हा शब्द दिला. तुम्ही प्रामाणिक पणे काम करत रहा,काम करत असताना एकत्र काम केल्याने सामाजिक प्रश्न जलद गतीने सुटतात.त्यामुळे तुमच्या या कार्याला माझी साथ ही कायम असेल असा शब्द त्यांनी दिला.त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी सौ.वैशालीताईंनी त्यांचे आभार मानले.