“भारतरत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हसळा वाचनालयांत साजरी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सुशील यादव

म्हसळा :प्रतिनिधी 

     भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे “भारतरत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयांत साजरी करण्यात आली .

    माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले .यावेळी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,संचालक प्रा.आर.एस.माशाळे ,वाचक धनंजय घुले ग्रंथपाल उदय करडे सायली चोगले आदी उपस्थित होते .

        यावेळी वाचनालयाने ग्रंथ प्रदर्शन भरविले होते त्यामध्ये भारताचे संविधान , भारताची राज्यघटना, भारतीय घटनेचे शिल्पकार , महामानव , डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म , आठवणीतले बाबासाहेब , आंबेडकर संस्कृती , डॉ. आंबेडकर एक चिंतन , धम्म चक्र प्रवर्तक ज्ञानयोगी बाबा साहेब आंबेडकर , डॉ. बाबा साहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे,कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला अशी अनेक पुस्तके ठेवण्यात आली होती.               

    यावेळी प्रा.माशाळे यानी आपल्या मनोगतांत बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते.ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगितले .ते एक प्रख्यात विद्वान, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले होते. असे सांगितले .

         म्हसळा पोलीस स्टेशन आणि अन्य कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले .बौद्धपंचायतीचे सुरेश जाधव याच्या नेतृत्वाखाली म्हसळा शहरांतून बौद्ध भिक्षु आणि महिलांसह भव्य मिरवणुक काढण्यात आली होती .


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!