भंडारा सेवा संस्थेचे आरोग्य,क्रीडा शिक्षण, या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय : विकास अहिर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
                    भंडारा सेवा संस्थेचे आरोग्य,क्रीडा शिक्षण, या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून भविष्यात या व्यासपीठावर दर्जेदार खेळाडू तयार होतील असे प्रतिपादन माण तालुकाचे तहसीलदार विकास अहिर यांनी विरकरवाडी येथे कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.
                 जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन झाले यावेळी माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ        बिरकर,प्रा मोहन विरकर,केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार,डॉक्टर प्रमोद गावडे ,क्रीडा समनव्यवक राजाराम तोरणे पंच चंद्रकांत         तोरणे,घाडगे सर,भालेकर सर ,विशाल विरकर ,बाळराजे विरकर ,मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे  ,श्रीकांत विरकर यासह अनेक        मान्यवर उपस्थित होते.  नागोबा यात्रेनिमित्त भंडारा सेवा संस्थेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते.
                 यावेळी तहसीलदार अहिर पुढे म्हणाले की, कबड्डी हा खेळ अटीतटीचा असून मला खेळाची आवड आहे परंतु केंद्रीय मंत्रांचा दौरा असल्याने सामन्याचा आनंद घेता येणार नाही. केंद्रप्रमुख विरकर म्हणाले की,माण तालुका क्रीडा क्षेत्रात अव्वल असून येथील खेळाडू ग्रामीण भागातून जाऊन खडतर परिस्थितीवर मात करून राज्य व देशपातळीवर क्रीडा संघाचे नेतृत्व केले आहे. यावेळी तहसीलदार यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम आलेल्या शंभू महादेव विद्यालयातीळ ध्रुवीत माने,भूमिका माने,मृदुला मोहिते,श्रुती दोलताडे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या सुरुवातीला मुलींची कबड्डी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये शंभू महादेव विद्यालय वरकुटे म्हसवड येथील मुलींनी बाजी मारली
                तसेच फायनल स्पर्धेत आदर्श जनता विद्यालय यांचा प्रथम क्रमांक, शंभू महादेव विद्यालय कुकुडवाड यांचा व्दितीय तर शंभू महादेव विद्यालय वरकुटे म्हसवड यांनी  यांचा तुतीय .क्रमांक पटकावला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळराजे विरकर यांनी केले स्पर्धेचे निवेदन राजाराम तोरणे यांनी केले. यावेळी  शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अश्विनी शिंदे,वर्षा बनगर, सारिका विरकर ,पंढरीनाथ विरकर, ,श्रीधर विरकर, हरीश विरकरअनिता तोरणे, पल्लवी जगताप ,कांतीलाल खाडे ,दोलताडे सर,

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!