भालवडी माध्यमिक विद्यालयास राज्याच्या प्राथमिक शिक्षण उपसंचालकांची भेट!
व्हिजन२४तास न्यूज म्हसवड
विठ्ठल काटकर
कुकुडवाड/वार्ताहर
माण तालुक्यातील कै आबासाहेब पोळ शिक्षण सौस्था ही अतिशय ग्रामीण भागात काम करीत असून सौस्थेच्या सर्व शाखा गुणवत्ता पूर्ण काम करीत आहेत असे गौरउदगार राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक देविदास कुलाळ साहेब यांनी काढले.
भालवडी ता. माण येथें आज शनिवारी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. त्याच्या सोबत माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलाळ म्हणाले की मी माण तालुक्यात काम केले असून या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्यांनी अतिशय कष्ट व अडचणीतून माण तालुक्यातील ग्रामीण भागात संस्थेच्या शाखा सुरु करून मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली आहे. ज्या गावात मुलींना शिक्षण मिळणं दुरापास्त झालं होत अशा ठिकाणी तात्यांनी शाळा सुरु केल्या त्यामुळे या तालुक्यातील असंख्य मुली शिकल्या असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे.
या वेळी त्यांनी शाळेतील शालेय पोषण आहार बाबत सखोल चौकशी करून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर राज्याच्या पोषण आहाराचा प्रमुख म्हणून मी काम करीत असून विद्यार्थासाठी येणारा पोषण आहाराचा माल तपासून घ्या, तो स्वच्छ व दर्जेदार नसेल तर माल परत करा, मात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही शाळेने निकृष्ट दर्जाचा भात दिल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दररोज पोषण आहाराची तपासणी करावी, तुमची काही अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
भालवडी विद्यालयाचे सर्व विभागाची पाहाणी करून त्यांनी कामकाजबाबत समाधान व्यक्त केले.
शनिवारी कार्यालयास सुट्टी असूनही स्वस्थ न बसता कुलाळ साहेब व पिसे साहेब यांनी आज अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.
भालवडी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन पुकळे यांनी कुलाळ साहेब व पिसे साहेब यावेळी स्वागत केले.