व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
विठ्ठल काटकर
कुकुडवाड/प्रतिनिधी
कै आबासाहेब पोळ शिक्षण सौस्थेच्या माण तालुक्यातील भालवडी माध्यमिक विद्यालयात तीळ गूळ व महिला शिक्षकांना वाणवसा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पारंपरिक वेशभूषा भूष्या करून केलेल्या वेशभूषा काय विचार देते याचे विवेचन केले.या निमित्ताने विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्याच बरोबर शाळा कुटूंबात काम करणाऱ्या महिला शिक्षकांना सुहासिनीचा मान म्हणून वाणवसा देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य गजानन पुकळे यांनी सांगितले की असे विशेष दिवसाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना व विचाराला वाव देण्याचा चांगला प्रयत्न आज झाला, त्या निमित्ताने विदयार्थी व विद्यार्थिनींना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. तीळ गूळ वाटप कार्यक्रम व त्यामधून मिळणारा चांगला संदेश मिळाला असे त्यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ शिक्षक शिवाजी साळूंखे यांनी विचारधन विद्यार्थ्यांना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा खासबागे यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थिती होती.