दहिवडी पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशन अवॉर्ड.. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार
व्हिजन२४तास न्यूज
*दौलत नाईक*
दहिवडी/प्रतिनिधी:
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला सुरक्षा पथदर्शी अवॉर्ड देण्यात येतो. त्यामध्ये या वर्षीचा हा पुरस्कार दहिवडी पोलीस ठाणेला जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचेकडून प्रदान करण्यात आला.
आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून दहिवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गावागावातील विद्यार्थिनी,माता-भगिनी सुरक्षित रहावे यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये येथे सदिच्छा भेट देऊन महिला सुरक्षितता कायद्याविषयी माहिती देऊन जनजागृती केली.
दहिवडी परिसरातील शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनींना वर्गामध्ये शालेय जीवनामध्ये वावरत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे. कसे वागले पाहिजे. महाराष्ट्र मध्ये महिलांच्या बाबतीत आतापर्यंत ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत या घटनेची आठवण करून देऊन आपण आपल्या जीवनामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याचे उत्तम प्रशिक्षण दिले.
कोणीही पुरुष किंवा मुले महिलांना किंवा शालेय विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असतील तर शासनाने महिलांसाठी टोल फ्री नंबर 112 हा कार्यरत ठेवला आहे. त्यावर कॉल करून सदर घटनेची माहिती दहिवडी पोलिसांना द्यावी. अशा सूचना देखील केल्या.
महिलांना व शालेय विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांना दहिवडी पोलिसांनी आपली खाकी दाखवत चुकून देखील काढले आहे. त्यामुळे या परिसरातील महिलांवर अन्याय अत्याचार पूर्णपणे दूर झाले आहेत.यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नीलम गोरे-रासकर्, पोलीस नाईक योगेश बागल, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण कुचेकर यांचे सर्व स्तरातून आभार मानले जात आहेत.
*
दहिवडी पोलीस ठाण्याच्या या आदर्शवत कामगिरीबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व सर्वच कर्मचाऱ्यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आभार मानले जात आहेत.