चार वर्षे फरार असलेला जबरी चोरीचा आरोपी अखेर गजाआड! म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई – गुन्हेगारास शिताफीने अटक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड प्रतिनिधी
चार वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि न्यायालयात हजर न राहणारा जबरी चोरीचा आरोपी अखेर म्हसवड पोलिसांच्या जाळ्यात अडकला! खऱ्या अर्थाने पोलिसांची शिताफी, तांत्रिक कौशल्य आणि धाडसी कारवाई यामुळेच ही अटकेची मोहीम यशस्वी झाली.

सन 2019 मध्ये गु.र.नं. 30/2019 अन्वये भादंवि कलम 394, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रोहिदास शिवाजी जाधव याने आपल्या साथीदारांसह तक्रारदारास लोखंडी रॉड व इतर घातक शस्त्रांनी बेदम मारहाण करून त्याची सोन्याची चैन जबरी हिसकावून घेतली होती. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर झाले, मात्र आरोपी गेली चार वर्षे फरार होता!

न्यायालयीन प्रक्रिया चालू असतानाही आरोपी न हजर राहिल्यामुळे त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. अनेक प्रयत्नांनंतरही तो सापडत नव्हता.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने अखेर रोहिदास जाधवचा ठावठिकाणा पळशी गावात लागला. तात्काळ सापळा रचून त्यास अटक करण्यात आली आणि आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या शानदार कारवाईमागे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात पो.ना. भगवान सजगणे, धीरज कवडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलानी, राहुल थोरात व महिला पोलीस हर्षदा गडदे यांनी मोलाची भूमिका बजावली.

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!