व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड :
सालाबादप्रमाणे याही वर्षी लोणार खडकी येथे मरीआई देवी यात्रेनिमित्त ३१ मे रोजी दुपारी ४ वा.निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. या मैदाना मध्ये एक नंबरची १ लाख इनामाची कुस्ती माण तालुक्याचे पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सौजन्याने पै.समीर शेख पुणे विरुद्ध पै.राघू ठोंबरे कोल्हापूर यांचेमध्ये होणार आहे. दोन नंबरचे 75 हजार ईनामाची कुस्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह दादा जगताप यांचे सौजन्याने पै.भैया देशमुख म्हसवड विरुद्ध पै.विशाल राजगे पिंपरी यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची पन्नास हजार इनामाची कुस्ती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई व माण तालुका मार्केट कमिटी अध्यक्ष विलास देशमुख यांच्या सौजन्याने पै.समाधान खांडेकर खडकी विरुद्ध पै. प्रशांत गोपणे नातेपुते यांच्यात होणार आहेत.
चार नंबरची कुस्ती पंचवीस हजार इनामाची इंजबाव सोसायटीचे माजी चेअरमन बसवेश्वर खांडेकर व ग्रामपंचायत सदस्य देवाप्पा खंडेकर यांच्या सौजन्याने होणार आहे.
तसेच ५० रुपये पासून १०,००० पर्यंतच्या कुस्त्या मैदानामध्ये फिरवून लावल्या जातील. अशी माहिती लोणार खडकी कुस्ती कमिटीने दिली.