दिवड पाटीजवळ क्रेटा कार व स्कुटी अपघात एक ठार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड – दहिवडी रोडवर दिवड फाट्याच्या जवळ क्रेटा व इलेक्ट्रिक बाइक यामध्ये  भिषण अपधात होऊन स्कुटी स्वार जाग्यावर ठार झाला
       याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दिनांक 16/12/2023 रोजी दुपारी 1:30 वा. चे सुमारास मौजे दिवड ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत हॉटेल गणेश चे समोर सातारा ते पंढरपुर रोडवर बाळु शंकर साळुंखे वय 57 वर्षे. रा. पाटोळे-खडकी ता. माण जि. सातारा हे त्यांचे ताब्यातील TVS iQube या कंपणीचे स्कुटी क्र MH14LC3812 वरुन पळशी बाजुकडुन म्हसवड बाजुकडे येत असताना समोरुन म्हसवड बाजुकडुन येणारे ह्युदाई कंपणीची क्रेटा कार क्र MH45AQ4056 वरील चालक नामे राजरतन सुदाम नागरगोजे यांने त्याचे ताब्यातील कार भरदाव वेगात निष्काळजीपणे रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन रंग साईटला जावुन स्कुटी क्र MH14LC3812 हीस समोरुन धडक देवुन अपघात करुन स्कुटी क्र MH14LC3812 वरील चालक बाळु शंकर साळुंखे रा. पाटोळे खडकी ता. माण जि.सातारा याचे मृत्युस व दोन्ही वाहनाचे नुकसाणीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन  ह्युदाई कंपणीची क्रेटा कार क्र MH45AQ4056 वरील चालक नामे राजरतन सुदाम नागरगोजे रा. अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर याचे विरुध्द  तक्रार किसन लक्ष्मण माने वय-50 वर्षे, रा-पाटोळे खडकी ता. माण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली  आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!