बाळासाहेब दोडतले (मा.राज्यमंत्री) यांचा लवकरच माण तालुका दौरा; माढा लोकसभा संदर्भात महत्वपूर्ण बैठक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड : प्रतिनिधी :
नव्वदच्या दशकात बारामतीच्या बी.के.कोकरे साहेब यांनी यशवंत सेना या संघटनेची स्थापना केली व धनगर समाजाच्या एस.टी.प्रवर्ग आरक्षण मागणीसाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलन छेडले.त्यातून धनगर समाजाला एन.टी.प्रवर्गाच्या सवलती लागू झाल्या.
बी.के.कोकरेंचा आरक्षणाचा हाच लढा घेऊन आज यशवंत सेनेची राज्यभर धनगर समाजात आरक्षण संकल्प रॅली सुरु आहे.यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी महामंडळाचे मा. अध्यक्ष बाळासाहेब दोडतले (मा.राज्यमंत्री दर्जा) यांचा यशवंत सेनेच्या माध्यमातून माण तालुक्यामध्ये लवकरच दौरा संपन्न होत आहे. 
नुकताच यशवंत सेनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा दौरा मा. बाळासाहेब दोडतले यांचा सुरू आहे. तदनंतर ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत मा.माणिकराव दांगडे-पाटील : प्रदेशाध्यक्ष, मा.नितीनदादा धायगुडे, मा.दादासाहेब केसकर, मा.अण्णासाहेब रुपनवर आदी प्रमुख पदाधिकारी असणार आहेत.
या दौऱ्यामध्ये धनगर समाजासह वंचित बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यां विषयी विशेषता धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणासंदर्भात महत्त्वपुर्ण चर्चा  विनिमय होणार असून पुढील दिशा ठरवण्याकरिता हा महत्त्वपूर्ण दौरा असणार आहे. माण- खटाव मतदारसंघासह माढा व बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बाळासाहेब दोलतडे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे.यामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमातून विविध पक्षांमध्ये काम करित असलेले आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित जमा होणार आहेत.तरी या दौऱ्याची माण- खटाव तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठी तयारी केली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!