कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल… खासदार उदयनराजे भोसलेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कराड कुलदीप मोहिते

सविस्तर वृत्त… महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे काही ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे काही ठिकाणी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे काही ठिकाणी उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी कालावधी लागत आहे वरिष्ठ नेते बंडखोरी टाळण्यासाठी सावध पवित्रा घेत आहेत

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जवळजवळ उमेदवारी व लढती स्पष्ट होताना दिसत आहेत कराड दक्षिण मध्ये महायुतीमध्ये पहिल्याच यादी स्थान मिळालेले अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला कराडच्या प्रशासकीय इमारतीत जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला कराडच्या प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले विक्रम पावसकर सुरेश भोसले मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली व कराड दक्षिण साठी आणलेल्या विकास कामाची माहिती दिली

       कराड दक्षिणची जनता येत्या निवडणुकीत आमच्या बाजूने कौल दिल असा विश्वास व्यक्त केला कराड दक्षिण निवडणूक यंदा राज्याच्या चर्चेचा विषय ठरेल असे जाणकार सांगतात यावेळी अतुल भोसले यांनी अत्यंत साध्या पद्धतीने वेशभूषा केली होती यावेळी त्यांच्यासोबत विक्रम पावस्कर सुरेश भोसले दयानंद पाटील जगदीश जगताप धनाजी पाटील रोहिणी शिंदे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!