वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ईम्तियाज नदाफ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुजातदादा आंबेडकर यांची उपस्थिती

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी, २१ ऑक्टोबर २०२४: वंचित बहुजन आघाडीचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ईम्तियाज नदाफ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी युवकांचे प्रेरणास्थान व वंचितांचा बुलंद आवाज, आदरणीय सुजातदादा आंबेडकर, म्हसवड आणि दहिवडी नगरीमध्ये येणार आहेत.

सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळी १०:०० वाजता म्हसवड येथील बुद्धविहार येथे एका छोटेखानी सभेने सुरू होईल. त्यानंतर बाईक रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत गोंदवले मार्गे दहिवडी तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.

बाईक रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथून होणार आहे. या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व युवा आघाडी, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा उद्देश वंचित बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणे आणि आगामी निवडणुकीसाठी जनतेमध्ये उत्साह निर्माण करणे आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!