पानवण येथील ४ जणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात अ़ॅट्रॉसिटीचा गुन्हा 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
जातिवाचक शिवीगाळ करून.   मारहाण .केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात  पानवण येथील ४ जणांवर अ़ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
      या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी  पानवण ता माण येथील देवदास महादेव तुपे( वय 17वर्षे ) जात हिंदु मांग  याने म्हसवड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असुन  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की
दि 26/08/2023 रोजी सकाऴी 09.00 वा. चे सुमारास मौजे पाणवन ता.माण गावचे हद्दीत महालक्ष्मी खाताचे दुकानाचे समोर   माझ्या   आईने गुरांसाठी कडवळ घेण्यासाठी अगोदर दिलेले पैसे देवदास रोहिदास नरऴे यास परत मागितले असता त्याचा राग मनात धरुन  1)देवदास रोहिदास नरऴे ,2)पिंटु उर्फ शाताराम रोहिदास नरळे  3)संतोष गोपाळ नरळे  4)  जनाप्पा विठ्ठल शिंदे सर्व रा पाणवन ता माण जि सातारा यांनी आपआपसात संगणमत करुन आमची जात मातंग असल्याचे माहीत असुन ही त्यांनी
माझी आई शाहिदा हीस पिंटु उर्फ शाताराम रोहिदास नरळे याने उसाने,जनाप्पा विठ्ठल शिंदे यांने काठीने तसेच देवदास रोहिदास नरऴे व संतोष नरऴे याने माझे आईचे डोक्याचे केस धरुन फरपटत रस्त्यावर आणुन तिचे आंगाशी झोंबाझोंब करुन मलाही चौघांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन तिचे मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य करुन “या मांगाट्यांना लय मस्ती आलीय त्यांना गावातुन हकलुन बाहेर काढु” असे म्हणुन धमकी दिली म्हणुन देवदास महादेव तुपे यांने1)देवदास रोहिदास नरऴे ,2)पिंटु उर्फ शाताराम रोहिदास नरळे  3)संतोष गोपाळ नरळे  4)  जनाप्पा विठ्ठल शिंदे सर्व रा पाणवन ता माण जि सातारा यांचे विरुध्द  म्हसवड पोलीसठाण्यात तक्रार दिली  त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात वरील चार जणावर गूरनं व कलम म्हसवड पोलीस ठाणे गु र नं 272/2023 अ.जा.ज.का कलम 3(1)(r)(s), 3(2)(va),6 IPC 324,323,354, 504,506,34 .  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 
        वर नमूद गुन्हयातील आरोपी एक व दोन यांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरु आहे . अधिक तपास सपोनि राजकुमार भूजबळ करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!