विधानसभेसाठी सर्व तालुके एकसमान करा. अथवा तालुका निहाय मतदार संघ बनवा : सादिक खाटीक
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
आटपाडी : ( प्रतिनिधी )
विधानसभेचे मतदार संघ *” तालुका निहाय “* निर्माण करून छोट्या तालुक्यांवर होत असलेला अनेक दशकांपासूनचा अन्याय दुर करावा अथवा लहान तालुक्यांना विधानसभेला अनुकुल मतदार संख्येचे बनविण्यासाठी लगतच्या मोठ्या तालुक्यातील अनेक गावांचा समावेश करून *लहान तालुके ही सक्षम व्हावेत* म्हणून केंद्र – राज्य सरकारने पुढाकार घ्यावा . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
विविध दैनिकांच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधताना सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले .
महाराष्ट्रातील संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य महोदयांनी या न्याय मागणीवर केंद्र – राज्य सरकारकडे आग्रही भूमिका घ्यावी अशी नम्र – प्रांजळ भावनाही सादिक खाटीक यांनी यावेळी व्यक्त केली .
खानापूर – आटपाडी या दोन तालुक्यांच्या एकत्र विधानसभा मतदार संघाचा उदाहरण म्हणून विचार केल्यास १९५२ पासून संपन्न झालेल्या विधानसभेच्या एकूण १५ निवडणुकांपैकी कवठेमहंकाळ – आटपाडी विधानसभा मतदार संघाच्या दोन निवडणूकीचा अपवाद वगळता १२ वेळा खानापूर तालुकावाशीय आणि फक्त एक वेळ आटपाडी तालुकावाशीय आमदार होवू शकला . दोन वेळच्या निवडणूकी मध्ये एक वेळ कवठेमहंकाळ तालुकावाशीय तर एक वेळ आटपाडी तालुकावाशीय नेतृत्व आमदार होवू शकले . दोन तालुक्यांच्या एकत्रित मतदार संघामध्ये ज्या तालुक्याचे मतदान जास्त त्या तालुक्याचा प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून जातो . त्यामुळे लहान तालुक्यांना किमान ५० वर्षे आमदारकी पासून उपेक्षित, वंचित, मागास रहावे लागले आहे . हे निर्घुण अन्यायी आहे . ही विसंगत अन्यायी रचना तात्काळ बदलणे गरजेचे आहे .
ज्या तालुक्यांची मतदार संख्या लहान तालुक्यांच्या तुलनेत दुप्पट – तिप्पट आहे अशा तालुक्यात विधानसभेचे २ – ३ मतदारसंघ बनवावेत . मिरज तालुक्याचे उदाहरण म्हणून घ्यायचे ठरल्यास तिथे सदयस्थितीत मिरज आणि सांगली असे वेगळे दोन विधानसभा मतदार आहेतच . त्याच पार्श्वभूमीवर सर्वात लहान तालुक्याची एकूण मतदार संख्या प्रमाण मानून राज्यभर या मतदार संख्येच्या न्यायाने, विधानसभेसाठी मतदार संघ निर्माण केले पाहीजेत . सध्याच्या २८८ मतदार संघाच्या ऐवजी एकुण ४०० – ४५० विधानसभा मतदार संघ निर्माण होतील . त्यामुळे प्रत्येक तालुक्याला एक, दोन, तीन अशा पटीत आमदार मिळतील . त्यामुळे कोणत्याच तालुक्यावर अन्याय न होता, सर्व तालुके विकासाच्या पातळीवर समानतेने धावतील . आणि हे करणे अशक्य असल्यास विधानसभेला अनुकुल तालुक्यांचा मतदारसंघ करताना लगतच्या मोठ्या तालुक्यातील अनेक जि.प . गटाचा लहान तालुक्यात समावेश करून राज्यातला *प्रत्येक तालुका* विधानसभा मतदार संघ योग्य बनावा . लहान आटपाडी तालुक्याला विधानसभा मतदार संघाच्या अनुकुल बनविण्यासाठी लगतच्या खानापूर तालुक्यातील खानापूर, लेंगरे, माण तालुक्यातील वरकुटे, माळशिरस तालुक्यातील पिलीव, सांगोला तालुक्यातील लोटेवाडी नाझरे कोळे या जि .प . गटाचा समावेश करून आटपाडी तालुका मोठा अर्थात विधानसभा मतदार संघ योग्य बनवावा आणि याच न्यायाचा राज्यभर अंगीकार व्हावा . यासाठी राज्य – केंद्र सरकारने तातडीने निर्णय करावा. असे ही सादिक खाटीक यांनी शेवटी स्पष्ट केले .