आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:-
              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एस एस सी बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
            शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल  अंतर्गत आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीच्या वर्गाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला.या शाळेतील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक कापसे सुयश विजय(९४.००%),द्वितीय क्रमांक खाडे धनराज नामदेव(९२.२०%) ,तृतीय क्रमांक राऊत अर्चिता गणेश(९०.८०%) व गुरव अस्मिता अशोक (९०.८०%) गुण संपादन करून उज्वल यश मिळविले.विद्यालयातील एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ९०%च्या वर ०६ विद्यार्थी,७५% च्या वर ३८ विद्यार्थी, तर १५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण संपादन केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ.सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ऍड. इंद्रजित बाबर,संचालक शरयू बाबर(देवकर),तात्यासाहेब औताडे ,मुख्याध्यापक अनिल माने, सर्व मार्गदर्शक शिक्षकवर्ग , तसेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व विभागप्रमुख सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक  या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!