पत्रकार मिलिंद लोहार यांना लोहार समाजाकडून विशेष सामाजिक पुरस्कार दीपक रावजी चव्हाण आमदार कोरेगाव फलटण मतदारसंघ व अरविंद मेहता ज्येष्ठ पत्रकार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
फलटण येथील कोळकी येथे लोहसंस्कार साप्ताहिकाचा अकरावा वर्धापन दिनानिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी पत्रकार मिलिंद लोहार विशेष सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याच प्रकारे भटका शोषित संघर्ष समिती महाराष्ट्र सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात घडणाऱ्या विविध बाबी लोहार समाजाबरोबरच 18 पगड जातींना न्याय देण्याचे काम माझ्याकडून होईल असे पुरस्कार दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना मिलिंद लोहार यांनी यावेळी सांगितले