म्हसळा तालुक्यातील मेंडडी येथे विकासकामांचे भूमिपूजन; खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सोहळा संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज संपादकअहमद मुल्ला
सुशील यादव
म्हसळा:(रायगड) प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यातील मेंडडी आणि खरसई गण परिसरात विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते मेंडडी येथील महत्त्वाच्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
या विकासकामांसाठी एकूण ३,४८,८३,७०८/- रुपये (अंदाजे ३ कोटी ४८ लाख) इतका भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
आगरी समाज मेंडडी आणि कोळी समाज मेंडडी येथील जेटी व पोच रस्ता दुरुस्त करणे, तसेच होळी उत्सव परिसर सुशोभीकरण करणे या कामांचा यात समावेश आहे.
ही कामे महाराष्ट्र शासन गृह विभाग (बंदरे व परिवहन) आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत पूर्ण केली जाणार आहेत.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ, आगरी व कोळी समाजातील मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “ग्रामस्थांच्या सोयीसाठी आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हे सुशोभीकरण व रस्ते दुरुस्तीचे काम अत्यंत महत्त्वाचे ठरेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मेंडडी ग्रामपंचायत आणि समस्त आगरी-कोळी बांधवांनी या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत. सदर कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत निवासी नायब तहसीलदार शेखर खोत,गट विकास अधिकारी माधव जाधव, तालुका अध्यक्ष समीर बनकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे,माजी सभापती महादेव पाटील,उद्योगपती जमीरभाई नजीर,माजी सभापती छाया म्हात्रे,स्वप्नील बिराडी, गण अध्यक्ष मोरेश्वर पाटील,महीला अध्यक्षा मीना टिंगरे,मधुकर गायकर,गण अध्यक्ष अनिल बसवत,प्रसाद बोर्ले,नाना सावंत, महेश घोले,लहू म्हात्रे, मंगेश म्हशीलकर,स्वप्नील चांदोरकर,मधुकर पाटील,नथुराम पयेर,लोमेश हरिचंद्र पाटील,माहीच्या नजीर,विजयबुवा पायकोळी,रमेश डोळकर,चंद्रकांत भगत,अखंड कोळी समाज व आगरी समाज मेंदडी ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

