माण तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून म्हसवड शहर व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे म्हसवड नगरपालिका हद्दीतील मासाळवाडी येथील वस्त्यावरील नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाई चा सामना करावा लागत आहे तरी तात्काळ त्या ठिकाणी पाण्याचे टँकर चालू करावे अशी मागणी माण – खटाव विधानसभा सदस्य आमदार जयकुमार गोरे यांचेकडे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी व माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ यांनी केली आहे आम. जयकुमार गोरे यांना दिलेल्या निवेदनात दोशी व मासाळ यांनी म्हटले आहे कि मासाळवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे अतिशय दुर्भीक्ष असून पाण्यासाठी तेथील नागरिकांचे अतोनात हाल चालू आहेत नगरपालिकेचा टँकर १० ते ११ दिवसांतुन एकदा येतो परंतु त्यामध्ये पिण्याची गरज भागत नाही आम्ही आपणास विनंती करतो कि मासाळ वाडी येथील वस्त्यावर दररोज दोन टँकर दिले जाणेबाबत आपणाकडून नगरपालिकेस सूचना व्हाव्यात अशी विंनती करण्यात आली आहे