सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील भारतीय सेनेतील व प्यारा मिल्ट्री फोर्स मधील सर्व आजी-माजी सैनिक ,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांना विनंती व जाहीर आव्हान. करण्यात आले आहे की*मंगळवार दि. 27/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता “अमृत वीर जवान अभियान अंतर्गत” सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाटण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री सुनील गाडे व तहसीलदार श्री विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसीलदार कार्यालय येथे सैनिक मेळावा/ बैठक आयोजित केली आहे. व तहसीलदार कार्यालय येथे “सैनिक कक्ष” स्थापन करण्यात येणार आहे
या सैनिक मेळाव्यासाठी तालुक्यातील पोलीस विभाग, भूमि अभिलेख विभाग, पंचायत समिती विभाग, नगरपरिषद विभाग, वन विभाग, महावितरण विभाग, सहकार विभाग,कृषी विभाग सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व पाटण तालुक्यातील सेवारत सैनिक/ माजी सैनिक/ त्यांचे कुटुंबीय व शहीद जवान कुटुंबीय यांनी आपले तक्रारी अर्ज बरोबर घेऊन येणे व या मेळाव्यासाठी बहुसंख्येने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहावे असे आव्हान प्रशांत कदम (माजी सैनिक)अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व अमृत वीर जवान अभियान व जिल्हा संरक्षण समिती माजी सैनिक संघटना प्रतिनिधी यांनी केली आहे तरी खालील नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
विक्रम वरेकर अध्यक्ष सैनिक फेडरेशन पाटण तालुका मो.+91 73789 00974
. प्रकाश मसुगडे कार्याध्यक्ष सैनिक फेडरेशन पाटण तालुका मो.95686 29194 मो.9766981256