केंद्रशाळा तारळे येथे गुणगौरव व उद्घाटन कार्यक्रम….!!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते

उंब्रज:प्रतिनिधी

जि.प.केंद्रशाळा तारळे ता.पाटण येथे नुकताच गुणगौरव सोहळा व इंटरअॅक्टिव्ह बोर्ड उद्घाटन कार्यक्रम अनेकविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शाळेच्या जडणघडणीत सदैव खंबीरपणे साथ देणारी तारळे केंद्र शाळेची शाळा व्य.समिती दरवर्षी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करते.याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांस सातारा जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री अनिस नायकवडी साहेब, पाटण तालुका गट शिक्षणाधिकारी सौ.दीपा बोरकर मॅडम,जि.प.शि.विस्तार अधिकारी श्री विजय जाधव, तारळेचे सरपंच श्री प्रकाश जाधव,उपसरपंच सौ.सुधा पवेकर,,मा.जि.प.सदस्य श्री रामभाऊ लाहोटी,मा.सरपंच श्री गजानन जाधव,तारळे भागाचे दमदार युवा नेते व तारळे केंद्र शाळेचे व्य.समितीचे कार्यतत्पर अध्यक्ष श्री अभिजित पाटील (काका),उपाध्यक्षा सौ.श्रुती पाटील,सर्व सदस्य व्यवस्थापन समिती,केंद्रप्रमुख श्री प्रल्हाद पवार, केंद्रसंचालक श्री अमितकुमार कांबळे,तारळे मुली शाळेच्या  अध्यक्षा सौ वर्षा जाधव तारळे ग्रामस्थ, व पालक इ.सर्वजण उपस्थित होते.


               कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली,प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री रियाज मणेर सर यांनी केले तद्नंतर शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते इंटरअॅक्ट बोर्ड उद्घाटन करण्यात आले. यावेळी  आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार व प्रभावी शिक्षण मिळेल असा विश्वास गट शिक्षणाधिकारी बोरकर मॅडम यांनी व्यक्त केला.यानंतर कार्यक्रमात श्री विजय जाधव यांचा शुभचिंतन कार्यक्रम घेण्यात आला.तारळे ग्रामपंचायती मार्फत शाळेस दिलेल्या प्लॅस्टिक संकलन युनिटचे उद्घाटन करण्यात आले.*शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यतत्पर* *अध्यक्ष श्री अभिजित पाटील(काका) यांच्या वतीने* मागील वर्षी विविध स्पर्धा परीक्षेत सुयश संपादीत गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

            गुणवंत विद्यार्थी सत्कार,इंटरअॅक्टीव्ह बोर्ड उद्धाटन,मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धा. स्वच्छ, सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून तारळे केंद्र शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने  शा.व्य. समिती   अध्यक्ष,उपाध्यक्ष,सद्स्य,शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,तसेच गुणवंत विद्यार्थी *इ.सर्वांचा सत्कार* शिक्षणाधिकारी मा.नायकवडी साहेब व गट शिक्षणाधिकारी  बोरकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.*तारळे मुले व मुली शाळेतील नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल शिक्षणाधिकारी श्री नायकवडी साहेबांनी गौरवोद्गार काढले.दोन्ही शाळांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व तारळे येथील स्पर्धा परीक्षा पॅटर्नचे कौतुक केले.* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रोशन मणेर यांनी केले.कार्यक्रम यशस्विरीत्या संपन्न करण्यास  तारळे केंद्र शाळेतील सर्व  शिक्षक श्री रियाज मणेर,सौ.रोशन मणेर,श्री अनिल लोहार,श्री संग्राम जगदाळे,सौ.मधुमती जगदाळे,सौ.प्रियांका साळुंखे, सौ.उंडाळे,सौ.कोळी इ.सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *