कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई:

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याची कक्षा महाराष्ट्रभरात व्यापक होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, संशोधक , संघटक,चित्रपट नाट्य समीक्षक , सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १९९८-१९९९ ला मुंबई जिल्हा कार्यवाह म्हणून योगदान देणाऱ्या *शीतल करदेकर यांची नियुक्ती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी* करण्यात आली आहे.
*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय कार्यवाह माधव अकलंगे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.*
*या नियुक्तीबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज वराडे तसेच केंद्रीय कार्याध्यक्ष डाॅ प्रदीप ढवळ यांनी करदेकर यांचे अभिनंदन केले आहे.*
*तर केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.*
या जबाबदारीच्या पदाबद्दल भावना व्यक्त करताना *शीतल करदेकर यांनी,”मराठी भाषा व साहित्य समृध्दी, सक्षमीकरणासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले”*


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!