विठ्ठलराव काटकर कुकुडवाड/वार्ताहर कुकुडवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर या ग्रामपंचायतला अद्याप ग्रामविकास अधिकारी नेमला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी तातडीने ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी कुकूडवाडचे माजी सरपंच बाळासाहेब काटकर यांनी लेखी निवेदन दिले आहे. याबाबत काटकर यांनी दिलेली माहिती अशी की कुकुडवाड ग्रामपंचायत मध्ये बाजूच्या किमान आठ वाडया वस्त्याचा समावेश असून आगसवाडी या गावाचा याचं ग्रामपंचायत मध्ये समावेश आहे. सद्या जुलै महिना सुरु असून या गावातील व परिसरातील विद्यार्थी विविध शैक्षणिक दाखल्यांचे कमी, तर विविध योजनाचे लाभार्थी, राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असे कामे असणारे लाभार्थी ग्रामपंचायत मध्ये आपल्या कामासाठी हेलपाटे मारीत आहेत. अनेक दाखले ग्रामपंचायत मधून मिळतं नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र माण पंचायत समिती कडून ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने गैरसोय झाली आहे. कुकुडवाड ग्रामपंचायत मध्ये वाडया वस्त्या सह डोंगरावर असणाऱ्या आगसवाडी या गावातील विद्यार्थी व नागरिकांना किमान दहा किलोमीटर चालत यावे लागते.व ग्रामपंचायत मध्ये येऊन कोणतेही काम होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तरी आठ दिवसात कुकुडवाड येथे ग्रामविकास अधिकारी यांची नेमणूक न केल्यास माण पंचायत समिती समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी सरपंच बाळासाहेब काटकर,ग्रामपंचायत सदस्य मनोज काटकर यांनी दिला आहे.