माण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी मोफत धान्याचा लाभ घ्यावा: तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे

बातमी Share करा:

व्हिजन २४  तास  न्यूज
  दहिवडी
प्रतिनिधी:दौलत नाईक
               माण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना शासनातर्फे मोफत धान्याचे वितरण माहे जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार असून याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माणचे तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे यांनी केले आहे.
 तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे माहिती देतांना म्हणाले,जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या कडील पत्र दि.०२/०१/२०२३ या कालावधीत अनुज्ञेय असलेले  अन्नधान्य मोफत लाभार्थ्यांना वितरीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्य अनुशंघाने माण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहाचे देय नियमित धान्य रास्त भाव दुकानदारांकडून मोफत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच माहे जानेवारी २०२३ पासून यापूर्वी देण्यात येणारे पीएमजेकेवाय (मोफत धान्य) बंद करण्यात आले आहे.
   तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यां वगळून इतर शिधापत्रिका एनपीएच या शिधापत्रिकाधारक यांना कोणत्याही प्रकारचा धान्याचा पुरवठा करण्यात येणार नाही, याचीही सर्व संबंधित शिधापत्रिका धारकांनी नोंद घेण्यात यावी.
   सदरचे धान्य हे ०१/०१/२०२३ ते ३१/१२/२०२३ या कालावधीसाठी पात्र लाभार्थी (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यां) यांना मोफत स्वरूपात मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे यांनी केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!