व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये दिवस साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम विषयी जनजागृती झाली पाहिजे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला. होम.डि.वाय.एस.पी यांच्यासह सर्व अधिकारी यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.उपस्थित सर्व पोलीस अधिकारी यांना तंबाखूचे दुष्परिणाम विषयी माहिती तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष) श्री.रवींद्र कांबळे यांनी दिली.तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम चे सामाजिक कार्यकर्ता मालतेश तांदळे यांनी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले थीम विषयी व COTPA कायदा 2003 विषयी माहिती दिली. होम.डी.वाय.एस.पी श्री.बोडके साहेब यांनी सर्व अधिकारी व समाजातील सर्व लोकांना तंबाखूमुक्त राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी होम. डि.वाय.एस.पी श्री.बोडके साहेब, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम चे सामाजिक कार्यकर्ता श्री.मालतेश तांदळे ,तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवा संस्थेचे (अध्यक्ष) श्री. रवींद्र कांबळे (सचिव)सौ.ज्योती राजमाने मॅडम उपस्थित होत्या . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम सौ ज्योती राजमाने यांनी घेतले