लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांची यशस्वी कारवाई – दोन जणांना रंगेहाथ पकडले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख, सातारा
सातारा – दि. ६ फेब्रुवारी २०२५

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सातारा यांनी अवैध दारू विक्री प्रकरणात लाच स्वीकारताना दोन जणांना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई दि. ५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, कराड यांनी अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई केली होती. यानंतर, आरोपी भिमराव शंकर माळी (३७ वर्षे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कराड) यांनी तक्रारदारास मदतीसाठी व पुन्हा दारू विक्रीचा व्यवसाय चालू करण्यासाठी ६,००० रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर रक्कम ५,००० रुपये ठरली. यातील पहिला हप्ता ३,००० रुपये आरोपीने मुस्तफा मोहिदिन मणिवार (२५ वर्षे, देशी दारू दुकान मॅनेजर, मलकापूर) याच्याकडे देण्यास सांगितला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात आरोपी मुस्तफा मोहिदिन मणिवार यांनी पंचासमक्ष ३,००० रुपये स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा पथक:

पोलीस निरीक्षक श्री किशोरकुमार खाडे,पोहेकॉ. ऋषीकेश बडणीकर,पोना. प्रितम चौगुले,पोशि. सुदर्शन पाटील,चालक विठ्ठल राजपूत,

तपास अधिकारी:

श्री सचिन राऊत, पोलीस निरीक्षक, ACB सातारा

मार्गदर्शक अधिकारी:

श्री शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ACB पुणे

श्री विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, ACB पुणे

श्री राजेश वाघमारे, पोलीस उप-अधीक्षक, ACB सातारा 

या कारवाईबद्दल जनतेतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे कौतुक होत आहे.

जनतेसाठी आवाहन:
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित तक्रार दाखल करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. संपर्कासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

मोबाईल अॅप: www.acbmaharashtra.net

फेसबुक: www.facebook.com/maharashtraACB

वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in

हेल्पलाईन क्रमांक: १०६४

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक: ०२१६२-२३८१३९

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!